Wednesday, 1 May 2019

थोडे त्रिकोण, काही काटकोन



थोडे त्रिकोण, काही काटकोन 

चवीनुसार मीठ अन् चिमूटभर साखर,
आणि जरा वेलचीचा गरजेनुसार वापर.
मनामध्ये असल्यास मनासारखे जर,
लज्जतदार गुलाबजाम जसा खरोखर.
   
केव्हातरी गुलाबजाम फुलत नाही बरा,
तेव्हा मुद्दाम घ्यावा त्यातला गोडवा जरा.

यंत्रावरचे बटण, बटणावर सारे खेळ,
सरतो काटा झटपट, निसटून जाते वेळ.
एखाद्या संध्याकाळी खावी चौपाटीची भेळ,
फोटोविना करावा तेव्हाच आठवणींचा मेळ.

कधीतरी भेळीमधली मिरची देती कळा,
तेव्हा घ्यावा खट्टा मिठ्ठा बर्फाचा गोळा.

आयुष्याच्या गणिताचे किस्से एक दोन
त्यात थोडे त्रिकोण, तर काही काटकोन. 




31 comments:

  1. फारच सुंदर आहे अमेय..👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद कृष्णा !! :)

      Delete
    2. Khupch sundar.....chan shabdrachna....

      Delete
  2. मस्तच, आवडली.

    ReplyDelete
  3. अप्रतिम,खुपच छान
    जीवनातील असेच गोडवे कधी तरी घेत रहावे

    ReplyDelete
  4. Amazing piece..!! Keep inking :)

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर....
    👍👍👍👍

    ReplyDelete