Tuesday, 14 February 2017

आज-काल प्रेम वगैरे



आज-काल प्रेम वगैरे काही उरलेलं नाही
असं मला चुकूनही वाटलेलं नाही.

प्रेम आहे. आज-काल प्रेम आहे.
प्रेम आहे कारण....
फार दूरचं कशाला, दोन लोकांतच बघ ना,
भावना आहेत.
भावना आहेत म्हणून शब्द आहेत. शब्द आहेत म्हणून गीत आहेत.
गीत आहेत म्हणून गाण्याला चाल आहे. चाल आहे तेव्हाच तर संगीत आहे.
संगीत आहे त्यावरून आठवलं, Guitar आहे.
आणि Guitar वर अरिजीत चं गाणं कसं खुलून येतं.
किंवा "चुरा लिया है तुमने  जो दिल को" एकांतात ऐकलं की,
प्रेम वगैरे आज काल आहे, हा विश्वास अधिक मजबूत होत जातो.

कदाचित प्रेम वगैरे असं काही नसेलही,
पण प्रेमात असताना, आपण जे आता आहोत त्याहून अधिक Better होऊ पाहतो ना..
नकळतपणे का होईना, स्वतः वर आधी पेक्षा जास्त जीव लावतो ना.
गालातल्या गालात मना मध्ये खुद्कन हसतो,
लगबगीनं चालतो-बोलतो. अनेकदा बावरतो आणि याच प्रेमामध्ये सावरतो.
हे प्रेम आहे, असं  आपल्याला कळत नसेलही,
याच नादात केव्हा तरी स्वतः शीच बोलतो, अन वारंवार आरशात पाहतो.

प्रेमा मध्ये आपण कसे फुलासारखे फुलतो, आणि एका वेगळ्याच नशेत झुलतो.
म्हणून म्हणतो प्रेम आहे. आज काल ही, प्रेम आहे.



9 comments: